Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादकन्नड वनविभागाची धडक कार्यवाई,अवैध लाकडाने भरलेला ट्रक केला जागेवरच जप्त

कन्नड वनविभागाची धडक कार्यवाई,अवैध लाकडाने भरलेला ट्रक केला जागेवरच जप्त

कन्नड वनविभागाची धडक कार्यवाई,अवैध लाकडाने भरलेला ट्रक केला जागेवरच जप्त

कन्नड :- कन्नड विभागाचे (प्रादेशिक ) वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.शिवाजी टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल श्री.के.आर जाधव वनरक्षिका श्रीमती उज्वला सोनवणे,दिपाली साळवे वन सेवक श्री.अशोक आव्हाड,सय्यद शेख मकसूद व वाहन चालक श्री.भाऊसाहेब वाघ व सहकाऱ्यांनी वन विभागाच्या परिसरात रात्रीच्या गस्तीवर असतांना कन्नड – चाळीसगाव हायवेवरील जीओ पेट्रोल पंपा नजीक एका ताडपत्रीने झाकलेला ट्रक आढळून आला असता त्या बाबत संशय येताच त्यांनी ट्रक चालकास झाकलेली ताडपत्री हाटवीण्याचे सांगितले असता,ट्रक चालक उडवाउडवीची उत्तरे देताच सदर पथकाने ताडपत्री हटवून पहिले असता त्यात संपूर्ण लाकडाचा माल आढळून आला.पथकाने सदर मलाबाबदची अधिकृत पावती / परवानगीची चौकशी केली असता त्या बाबत चालकाकडे अधिकृत काहीही पुरावा न मिळाल्यामुळे पथकाने जागेवरच कार्यवाई करून सदर ट्रक जप्त करून ट्रक क्र.एम.एच,04- जी.एफ -2080 मधील सात ते आठ टन लाकूड एकूण किंमत जवळजवळ 10 लाखाचे आसपास किमतीचे असणारे लाकूड जप्त केले,व ट्रक चालक मुद्दसर फारुख बेग वय वर्षे (35) रा.मालेगाव जि.नाशिक यास ताब्यात घेऊन त्यावर भारतीय वनअधिनियम 1927 नुसार गुन्ह्याची नोंद करून ताब्यात घेऊन कार्यवाई केली आहे.पुढील अधिकचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.शिवाजी टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल कैलास जाधव व त्यांचे सहकारी करीत आहे.प्राथमिक तपासात असे दिसून आले की,सदर ट्रक हा मालेगाव येथील व्यापाराचा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments