Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादमोक्षप्राप्ती म्हणजेच  काला - ह.भ.प. प्रकाश महाराज गोंदीकर गोंदी येथील श्रीदत्तजयंती महोत्सवाची...

मोक्षप्राप्ती म्हणजेच  काला – ह.भ.प. प्रकाश महाराज गोंदीकर गोंदी येथील श्रीदत्तजयंती महोत्सवाची सांगता

मोक्षप्राप्ती म्हणजेच  काला – ह.भ.प. प्रकाश महाराज गोंदीकर
गोंदी येथील श्रीदत्तजयंती महोत्सवाची सांगता

बदनापूर/प्रतिनिधी/ मनुष्य जीवन जगताना जिवंतपणी मोक्ष मिळवता
येतो. यासाठी केवळ नामस्मरण हेच साधन असून काला म्हणजे भगवंताने दिलेला
आणि याची देही याची डोळा अनुभवता येणारा जीवनमुक्तीचा प्रसाद होय असे
प्रतिपादन अध्यात्मरत्न ह.भ.प. प्रकाश महाराज गोंदीकर यांनी
श्रीगुरुदत्तधाम येथे श्री दत्तजयंती  महोत्सवाच्या  समारोप प्रसंगी
केले.
श्रीक्षेत्र गोंदी येथे सुरू असलेल्या श्रीदत्तजयंती महोत्सवाची सांगता
ह.भ.प. प्रकाश महाराज गोंदीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
त्यावेळी त्यांनी ‘उपजोनिया पुढती येवू’ या संत तुकाराम महाराजांच्या
अभंगावर विवेचन केले. श्रीदत्तजयंतीच्या निमित्ताने गोंदी येथील दत्त
मंदिरात श्री गुरु स्वामी स्तवराज चरित्र व श्रीगुरुचरित्राचे पारायण,
गीता विष्णुसहस्त्रनाम पाठ, श्रीदत्तपंचपदी, श्रीमद्भागवत कथा, मराठवाडा
नारदीय कीर्तन महोत्सव आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
होते.यात ह.भ.प.प्रदीप महाराज मुळे गोंदीकर यांनी श्रीमद्भागवताच्या
सप्तम स्कंधाचे भावपूर्ण विवेचन केले. तसेच मराठवाडा नारदीय कीर्तन
महोत्सवात ह.भ.प.सुहासबुवा रामदासी, ह.भ.प. योगीराजबुवा गोंदीकर,
ह.भ.प.श्रीपादबुवा गोंदीकर आदी युवा कीर्तनकारांनी नारदीय कीर्तनसेवा
समर्पित केली. यासाठी श्रीपाद मुळे, सुहास रामदासी यांनी संवादिनी तर
प्रमोद धर्माधिकारी यांनी तबला साथसंगत केली. ह.भ.प.संकेत महाराज सोळुंके
यांनी दररोज प्रवचनसेवा सादर केली.
गोंदी येथील श्रीगुरुदत्तधाम  येथे  विराजमान असलेल्या जगातील एकमेव श्री
पुष्कराज दत्तमूर्तीस विविध भक्तगणांनी रुद्राभिषेक केला तसेच दररोज
सायंकाळी विविध भक्तांनी भजन सेवा सादर केली. श्रीराम संस्थान साडेगावचे
महंत प.पु. सुरेश महाराज रामदासी यांची गुरुवारी पाद्यपूजा करण्यात आली.
यावेळी गोंदी परिसरातील बहुसंख्य भाविक भक्त उपस्थित होते. सात दिवस
चाललेला हा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीगुरुदत्तधाम परिवरातील सर्व
सदस्यांनी अपार परिश्रम घेतले. याबद्दल श्रीगुरुदत्तधामचे विश्वस्त
श्रीपाद मुळे, तथा कार्यवाह योगीराज मुळे गोंदीकर यांनी सर्वांचे आभार
मानले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments