Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा अभ्यासक्रमास प्रवेश देणे सुरु

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा अभ्यासक्रमास प्रवेश देणे सुरु

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा अभ्यासक्रमास प्रवेश देणे सुरु

नवीन अभ्यासक्रमानुसार जालना जिल्हा ग्रंथालय असोसिएशन तर्फे वर्ष-२०२६ साठी महाराष्ट्र शासन,ग्रंथालय संचालनालय,मुंबई मान्यता प्राप्त अभ्यासक्रम वर्ग सुरु होत आहे.  सहा महिने कालावधीच्या (जानेवारी ते जून) या वर्गात प्रवेश घेण्यासाठी बारावी पास ची गुणपत्रिका,प्रमाणपत्र,जातीचा दाखला,टी.सी.,आधार कार्ड व तीन फोटो या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

या अभ्यासक्रमात  ग्रंथालय आणि समाज,ग्रंथालय व्यवस्थापन,वर्गीकरण व तालिकीकरण (तात्विक),वर्गीकरण व तालिकिकरण (प्रात्याक्षिक),माहिती साधने आणि सेवा,ग्रंथालय तंत्रज्ञान,कार्यानुभव व प्रकल्प या विषयांचा समावेश आहे. दर शनिवारी व रविवारी वर्ग घेण्यात येतात.ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शाळा, महाविद्यालय,सार्वजनिक ग्रंथालये, आश्रम शाळा,न्यायालये,आरोग्य विभागासह अन्य विविध शासकीय कार्यालयांमध्ये सहायक ग्रंथपाल, ग्रंथालय परिचर या पदांवर नौकरीची संधी मिळते. यासाठी १५ डिसेंबर २०२५ पर्यंत परीक्षा केंद्र-ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय, जालना येथे संपर्क साधण्याचे आवाहन ग्रंथपालन वर्गाचे वर्ग व्यवस्थापक प्रवीण देशपांडे यांनी केले आहे.

वरील बातमी आपल्या सुप्रसिद्ध दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही विनती.

-शाम शेलगावकर

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments