Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादनैसर्गिक अनुदान घोटाळ्यात सहाय्यक कृषी अधिकाऱ्याचा सहभाग; आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

नैसर्गिक अनुदान घोटाळ्यात सहाय्यक कृषी अधिकाऱ्याचा सहभाग; आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

नैसर्गिक अनुदान घोटाळ्यात सहाय्यक कृषी अधिकाऱ्याचा सहभाग; आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

 
अंबड/प्रतिनिधी/ जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शासनाने वेळोवेळी चार जीआर काढत आर्थिक अनुदान जाहीर केले होते. मात्र या अनुदानात बोगस नावे अपलोड करून सरकारी निधीची अफरातफर केल्याच्या तक्रारी समोर आल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली होती.
याच पार्श्वभूमीवर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठित केली होती. समितीने केलेल्या सखोल तपासणीत 240 गावांमध्ये तब्बल ₹24,90,77,811/- इतक्या शासकीय रकमेचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस स्टेशन अंबड येथे गुन्हा रजि. क्र. 453/2025 प्रमाणे BNS कलम 316(4), 316(5), 318(4), 324(5), 336(3), 338, 340(2), 339, 238, 3(5) तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 52, 53 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून, याआधी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान घनसावंगी तालुक्यातील राजणी वाडी, भुतेगाव, कृष्णानगर गावांमध्ये पिकपाहणी पंचनामे आणि बाधितांची नावे अपलोड करण्याचे काम केलेले सहाय्यक कृषी अधिकारी केशव गंगाधर कचकलवाड यांचा गुन्ह्यात सक्रीय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा शोध सुरू असताना, ते इंदेवाडी येथील राहत्या घरी असल्याची माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज छापा घालत त्यांना ताब्यात घेतले. त्यांचे तपशील —
नाव : केशव गंगाधर कचकलवाड (वय 34)
व्यवसाय : कृषी सहाय्यक (राणीउच्चेगाव)
रा. गोळेगाव ता. उमरी जि. नांदेड, ह.मु. इंदेवाडी ता. जालना
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, प्रभारी उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा श्री सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत स.पोलीस निरीक्षक श्री मिथुन घुगे व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर तसेच महिला अंमलदार जयश्री निकम, निमा घनघाव, मंदा नाटकर यांनी योगदान दिले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments