Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादफुलंब्रीत संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकास अभिवादन

फुलंब्रीत संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकास अभिवादन

फुलंब्रीत संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकास अभिवादन
सामूहिक बौद्ध वंदना व उद्देशिकेच्या वाचनातून लोकशाही मूल्यांची उजळणी
फुलंब्री/प्रतिनिधी/  फुलंब्री शहरात संविधान दिनानिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व समाज बांधवांनी सामूहिक बौद्ध वंदना घेत वातावरण अधिक मंगलमय केले. कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
             भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संजय हिवराळे यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका मोठ्याने वाचून दाखवली. “अधिकार आणि कर्तव्य यांचा समतोल साधणारे, समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारलेले जगातील सर्वांत प्रगत संविधान आपल्याला लाभले आहे,” असे ते म्हणाले. उद्देशिकेतील शब्दांचा भावार्थ समजावत त्यांनी नागरिकांना संविधान मूल्यांनुसार वागण्याचे आवाहन केले. भारताचे संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले गेले आणि २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आले. विविधतेने नटलेल्या भारतीय समाजाला एकत्र ठेवणारी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक स्वातंत्र्याची चौकट संविधानाने दिली आहे. त्यामुळे संविधान दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून लोकशाहीची जाणीव दृढ करण्याचा दिवस असल्याचे वक्त्यांनी सांगितले. हा प्रेरणादायी कार्यक्रम फुलंब्री तालुका बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. नागरिकांनी संविधानाचे संरक्षण, पालन आणि प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त करीत कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाप्रसंगी माजी प. स. सभापती जे.पी. शेजवळ, पोलिस निरीक्षक संजय सहाणे, संजय मोरे, डॉ. के.बी. हिवराळे, बौद्ध महासभेचे सचिव विजय गंगावणे, तेजराव जाधव, कैलास भोसले, संदीप मोरे, सुखदेव नरवडे, ॲड.संगीता हिवराळे, इंद्राबाई जाधव, वेणुबाई हिवराळे, विजय गवळे, विशाल गंगावणे, किरण गंगावणे, संदीप जाधव, सोमनाथ रसाळ, अंनत वाघ, बाळू गंगावणे, आकाश गंगावणे यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन फुलंब्री तालुका बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आले होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments