Thursday, September 24, 2026
Homeऔरंगाबादजिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय फूटसाल स्पर्धा उत्साहात संपन्न

जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय फूटसाल स्पर्धा उत्साहात संपन्न

जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय फूटसाल स्पर्धा उत्साहात संपन्न
जालना/प्रतिनिधी/ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद जालना आणि जालना जिल्हा फूटसाल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय फूटसाल स्पर्धेचे आयोजन आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे करण्यात आले. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
     या स्पर्धेत ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल (मुले–17, मुली–19) आणि हुद्दा उर्दू स्कूल (मुले–19) या संघांनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मनोज इंगळे, सचिन बागल, किशोर जाधव, शेख जमीर तसेच जालना जिल्हा फूटसाल असोसिएशनचे शेख इस्माईल, शेख रियाज, सय्यद सुलतान उपस्थित होते. त्यांनी विजेत्या आणि सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देत फूटसालसारख्या वेगवान खेळाला जिल्ह्यात अधिक गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
     ही स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी श्री संजय गाढवे, क्रीडा अधिकारी सौ. लता लोंढे, सौ. आरती चिल्लारे, तसेच क्रीडा मार्गदर्शक श्री आशिष जोगदंड आणि श्री सिद्धार्थ कदम, गणेश गायके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments