Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादयुवा महोत्सवात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ ठरले अव्वल! युवा महोत्सवात...

युवा महोत्सवात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ ठरले अव्वल! युवा महोत्सवात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने उमटवली विजयी मोहर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत मिळवला पहिला क्रमांक

युवा महोत्सवात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ ठरले अव्वल!

युवा महोत्सवात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने उमटवली विजयी मोहर

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत मिळवला पहिला क्रमांक

 

छत्रपती संभाजीनगर :- असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या ३९ व्या सेंट्रल झोन युवा महोत्सवामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अव्वल क्रमांक मिळवत जेतेपद पटकावले. एमजीएम विद्यापीठात दिनांक २५ ते २९ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान आयोजित या युवा महोत्सवामध्ये सर्वाधिक १९ पारितोषिके जिंकत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने विजयी मोहर उमटवली. विजेत्या संघाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिने अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

जेएनईसी लॉन्स, एमजीएम विद्यापीठ येथे असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज ३९ व्या आंतर विद्यापिठीय सेंट्रल झोन युवा महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी, सिने अभिनेते उपेंद्र लिमये, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, एआययु’च्या अपर सचिव डॉ.ममता राणी अग्रवाल, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, एआययु अधिकारी डॉ.निर्मल जौरा, दीपक कुमार झा, महोत्सवाचे सचिव डॉ.शिव कदम व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.

पाच दिवस चाललेल्या ३९ व्या आंतरविद्यापिठीय सेंट्रल झोन युवा महोत्सवात मध्यप्रदेश, छत्तीसगडसह मराठवाडा आणि विदर्भातील २३ विद्यापीठातील ११०८ विद्यार्थी – विद्यार्थिनी आपला सहभाग नोंदवला होता. म्युझिक (९), डान्स (३), लिटररी (५), थेटर (४) आणि फाईन आर्ट्स (६) अशा एकूण मुख्य ५ कलाप्रकारांत विविध २७ प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यातील ७ विद्यापीठे, मध्यप्रदेश राज्यातील १३ विद्यापीठे आणि छत्तीसगड राज्यातील ३ विद्यापीठे असे एकूण २३ विद्यापीठांचा यामध्ये सहभाग होता. एकूण सत्तावीस स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या अशा एकूण ८१ स्पर्धकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी, या युवा महोत्सवात सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments