सिमेंट रस्त्याचे काम कासव गतीने सुरू परिसरातील नागरिकांची गैरसोय ठेकेदाराचा मनमानी कारभार
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर शहरातील नगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक ५ जुना मांजरी रोड या परिसरात सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत कासव गतीने सुरू असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मागील एक महिन्यापासून या परिसरातील सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. ठेकेदार याचा मनमानी कारभार असल्यामुळे हे काम होत नसल्याची चर्चा आहे. या कामाला मुहूर्त लागणार का? या कामाची सुरुवात कधी होणार असा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. या परिसरातील ५ रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर खडी पासून काम बंद करून देण्यात आले आहे या रस्त्यावरून रात्रीचं नागरिकांना चालना म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. सध्या नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाली सुरू आहे यामुळे या कामाला मुहूर्त लागत नाही का? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. या कामाचा आणि निवडणुकीचा काही संबंध येत नाही परंतु ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने हे काम करत असल्याची चर्चा आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. या रस्त्याचे काम चालू असल्यामुळे या परिसरातील जलवाहिनी जागोजागी फुटलेली आहे. लाखो लिटर पाणी वायाला जात आहे. फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करून हे काम पूर्ण करावे अशी मागणी जोर धरत आहे.