ड्राय डेच्या दिवशी दारू विक्री बंद शासनाने आदेश तरी विक्री जोमात अधिकारी कोमात चर्चेला उधाण
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर नगरपरिषदेची निवडणुकीसाठी दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० ते ५:३० पर्यंत मतदान टाकण्याची वेळ आहे ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर दोन दिवस आधी प्रचार बंद करण्यात येणार आहे. तसेच पुढील ४८ तास दारू विक्री बंद होणार आहे. हे नियम म्हणून ऐकायला भारी वाटतं किंवा खूप चांगला निर्णय आहे असं वाटतं, पण याचा खरोखर काही फायदा आहे का? तर याचा डायरेक्ट काही फायदा नाही. लोक ड्राय डेच्या आधी स्टॉक भरुन किंवा जमा करुन ठेवतात. अर्थतज्ज्ञ आणि संपादकीय मतंही हाच मुद्दा मांडतात की लोक आधीच साठवणूक करतात, त्यामुळे प्रत्यक्ष सेवनावर “तात्पुरता ब्रेक” इतकाच परिणाम होतो ड्राय डेच्या दिवशी काय होतं? दारू दुकानं/बार बंद असतात . पण काही जणांकडे घरात आधीच साठा असतो, तो चालूच असतो म्हणजे विक्री थांबते, पण सेवन थांबत नाही, फक्त लोकेशन बदलतं बारमधून घराच्या हॉलमध्ये. काही ठिकाणी ‘अवैध दारू विक्री’चा खेळहे थोडं काळं वास्तव, पण घडतं. ड्राय डेचा दिवस काहींसाठी संधी बनतो, अशावेळी लोक एमआरपी. पेक्षा जास्त किंमतीत दारु विकतात. अर्थात हे बेकायदेशीर आहे, पण सरकारी बंदी त्यामुळे काही प्रमाणात कायदेशीर व्यवसाय अवैध मार्गाकडे वळतो, अशी चर्चा आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मतदानाच्या दोन दिवसापूर्वी ज्या भागात आचारसंहिता लागू आहे. त्या भागामध्ये विविध दारू विक्री व तसेच परवानाधारकांना सुद्धा दारू विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येते. परंतु काही ठिकाणी दारू विक्री होत असल्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रशासन लक्ष करणार का? अवैध दारू विक्री बंद होणार का? याकडे सर्व सामान्याचे लक्ष लागले आहे.