प्रति,
जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत अनियमितता दुरुस्त करण्यात यावे — काँग्रेस कमिटीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन..
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब व खासदार मा डॉ कल्याण काळे साहेब यांच्या सूचनेनुसार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकिसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतील मतदारांच्या चुकीच्या नोंदनी, मतदारांचे नाव एका प्रभागातुन दुसरया प्रभागात स्थलांतर करण्यात आले, परप्रांतीय यांचे नाव मतदार यादित दिसुन आले, मतदराचे फोटो दोनदा, तीनदा तर कोठे दहा ठिकानी एक सारखे आढळले तसेच इतर अनियमितता प्रकरणी आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अतिक खान यांच्या नेतृत्वाखाली मा. ज़िल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. मा. ज़िल्हाधिकारी यांनी अक्षेप घेतलेल्या मतदार यादया लवकरच दुरुस्त करण्यात येतिल असे आश्वासन दिले..
यावेळी शकील शेख, चैतन्य जायभाये, इब्राहिम शेख, अड. दैने, वसीम शेख, करीम बिल्डर, सचिन जाधव, कलीम खान, अब्दुल रहीम तांबोली, रघुवीर गुडे, अड. सलमान, इमरान खान, फकीरा वाघ, नदीम भाई, संतोष पाटिल, मोहसिन खान, रोहित कसबे, शकील कुरैशी, जावेद शेख, नरेश रायपेल्ली , सय्यद कदीर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
-अतिक खान