सुखापूरी मध्ये भक्तीरसाचा महासागर!
अखंड हरिनाम सप्ताह व भागवत ज्ञानयज्ञाची 28 नोव्हेंबर पासून जयघोषाने सुरुवात
सुखापूरी/प्रतिनिधी/ सुखापुरी (ता. अंबड, जि. जालना) येथील श्री दत्त मंदिर, बाजार मैदान येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ‘श्री दत्त जयंती’ निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याचे हे 13 वे वर्ष असून, भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
सुखापुरी ग्रामस्थ मंडळ व सुखदेव गणेश मंडळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित हा सप्ताह शुक्रवार, दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू होणार असून, याची सांगता शुक्रवार, दिनांक ०5 डिसेंबर 2025 रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
कथा प्रवक्ते आणि दैनंदिन कार्यक्रम:
सप्ताहादरम्यान दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत ‘श्रीमद् संगीत भागवत कथा’ होणार आहे. कथा प्रवक्ते म्हणून प.पू. गुरुवर्य एकनाथानंद सरस्वती (भोलेबाबा) यांच्या शिष्या कु. स्वातीताई (भागवत उपासक, सिद्धेश्वर पिंपळगाव) या उपस्थित राहणार आहेत. त्यांना साथ संगत करण्यासाठी अरुण राखुंडे (सिंध व गायन) आणि गणेश डोर्ले (तबला) उपस्थित असतील.
सप्ताहाचा दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 वाजता काकडा भजनाने सुरू होईल. त्यानंतर विष्णूसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, गाथा भजन, हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 या वेळेत नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन व त्यानंतर हरिजागर होईल.