Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादमहार वतनाच्या जमिनी त्यांच्या मूळ मालकाच्या वारसदारांना परत करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी

महार वतनाच्या जमिनी त्यांच्या मूळ मालकाच्या वारसदारांना परत करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी

महार वतनाच्या जमिनी त्यांच्या मूळ मालकाच्या वारसदारांना परत करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी

 आत्ताच एक्सप्रेस

गंगापूर/प्रतिनिधी/  जिल्हाधिकारी  यांच्याकडे निवेदनाद्वारे महार वतनाच्या जमिनी  त्यांच्या मूळ मालकाच्या वारसदारांना परत करण्याची रिपब्लिकन सेनेची  मागणी  गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद तालुक्यासह छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील महार वतनांच्या जमिनी मूळ मालकांच्या वारसदारांना परत करण्यात यावी अशी मागणी  रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली या जमिनी तत्कालीन निजाम सरकारने इनाम स्वरूपात प्रत्येक गावात महार वतन हाडोळे त्यांना भेट म्हणून देण्यात आले आणि त्याकाळी ते करत असलेल्या त्यांच्या कामाच्या संदर्भात त्यांना या जमिनी इनाम स्वरूपात देण्यात आल्या जसे की परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर या जमिनी सरकारने ताब्यात घेऊन पुन्हा वाटप करण्यात आल्या, आणि या जमिनीचे खरेदी विक्रीचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले, परंतु कालांतराने काही प्रस्थापितांनी काय जमिनी संदर्भातले सर्व नियम धाब्यावर बसून त्या जमिनीच्या मूळ मालकांकडून त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन स्वतःच्या नावावर करून घेतल्या याप्रकरणी त्यांनी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी नियमानुसार (शासकीय चलन भरुन) घेतली नाही, या जमिनी कोणतीही परवानगी (शासकीय चलन) न घेता तत्कालीन ज्या अधिकाऱ्यांनी या जमिनींचे सातबारा उतारे दुसऱ्यांच्या नावावर केले त्यांची चौकशी करून व हे फेर रद्द करण्यात येऊन संबंधित मूळ मालकांना त्या जमिनी परत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर .मिलिंद बनसोडे मराठवाडा अध्यक्ष, विजय शिंदे मराठवाडा उपाध्यक्ष,

बबन साठे जिल्हा महासचिव पश्चिम, अजय बनसोडे शहर प्रसिद्ध प्रमुख छ.संभाजीनगर, सुनील पांडे जिल्हा प्रवक्ता, नाना सुर्यवंशी माजी युवा जिल्हाध्यक्ष,
योगेश दाणे जिल्हा संघटक, लखन थोरात ऊपाध्यक्ष गंगापूर, कुंदन मोरे ता.सचिव पश्चिम छ.संभाजीनगर,
शेषराव दाणे जेष्ठ नेते, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments