आष्टी ते पाथरी रोडवरील अवैध चैरटी देशी दारू जप्त करून कारवाई
दैनिक आताच एक्स्प्रेस
हादगाव/प्रतिनिधी/ 5 ते सहाच्या सुमारास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गायके यांना व त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहीती प्राप्त झाली की, मौजे रायगव्हाण रोडने फुलवाडीकडे अवैध्यरित्या दोन इसम डिस्कव्हर गाडीवर देशी दारुची चोरटी वाहतुक करत आहेत. पोलीस अंमलदार गायके यांनी ती माहीती मा. प्रभारी अधिकारी श्री सपोनि सुरवसे सो यांना देवुन त्याच्या आदेशाने प्रमाणे पोलीस अंमलदार गायके, पोकॉ. पांढरे, पोकों बादाडे, असे खाजगी वाहनाने मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी गेले असता आष्टी पाथरी जाणाऱ्या फुलवाडी जाणाऱ्या रोडवर एका डिस्कव्हर मो.सा. वर जाताना दोन इसम दिसले त्याच्या ताब्यात एका पांढऱ्या निळ्या रंगाच्या पिशवी मध्ये 21 देशी संत्रा भिंगरी कंपनीच्या काचेच्या बाटल्या व एक डिस्कव्हर गार्डी असा एकुण 62100/- रु चा मुद्देमाल ताब्यात घेवुन आरोपीताविरुध्द पोलीस अंमलदार गायके यांनी कलम 65 (अ) (ई), 83 महाराष्ट्र दारु बंदी कायदा अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले असुन पुढील तपास पोहेकों गायके हे करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री अजयकुमरा बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, उपविगीय पोलीस अधिकारी, परतुर श्री रेंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश सुरवसे, पोउपनि अजित चाटे, ग्रेड पोउपनि कांदे, पोहेकों गायके पोशि राणुजी पांढरे, पोशि डिगांबर बादाडे, यांच्या पथकांकडून कारवाई करण्यात आली.
