महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत
छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड परिमंडलाचे यश
9 सुवर्ण व 9 रौप्यपदकांसह चमकदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर : अमरावती येथे नुकत्याच झालेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड परिमंडलाच्या संघाने विविध क्रीडा प्रकारांत 9 सुवर्णपदके व 9 रौप्यपदके पटकावत उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. तिन्ही परिमंडलातील पदकविजेत्या सर्व कर्मचारी खेळाडूंचा प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जिवने यांच्या यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
महापारेषणच्या सभागृहात झालेल्या सत्कार समारंभास छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, महापारेषणचे मुख्य अभियंता जयंत विके, अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, बीना सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यस्तरीय स्पर्धेत सांघिक खेळात व्हॉलिबॉलमध्ये राघवेंद्र कापसे, ज्ञानेश्वर गाडेकर, बाळासाहेब ढगे, रियाज शेख, हामिद सय्यद, पवन सूर्यवंशी, फेरोज तांबोळी, गजानन निलपत्रेवार, परमेश्वर जाधव, किरण वीर, मनोज साळुंके व अमोल साळुंके यांनी सुवर्णपदक पटकावले. आशिष खानापुरे, रोहन श्रीरामवार, किरण पवार, गजानन राऊत व विशाल साळवे यांच्या चमूने टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले. बॅडमिंटनमध्ये गुणवंत इप्पर, दीपक नाईकवाडे, रतनसिंग दुकानदार, सय्यद अकबर, ईश्वरसिंग टेलर यांनी रौप्यपदक पटकावले. कॅरममध्ये इक्बाल खान, सचिन केळकर, केशव लटपटे, प्रमोद चौरे व शाम वाघचौरे यांना सुवर्णपदक मिळाले. ब्रिजमध्ये दीपक माने, दिलीप पवार, सतीश गुडे, ललितादास देशपांडे, सुशील ढगे, सत्यम जयस्वाल यांना रौप्यपदक मिळाले. वैयक्तिक विजेते : गोळा फेक – श्रीकांत धोत्रे (सुवर्णपदक), भालाफेक – बालाजी कांबळे (सुवर्णपदक), बुद्धिबळ – पंकज देशमुख (सुवर्णपदक), कुस्तीच्या विविध वजनगटांत मतीन शेख यांनी सुवर्ण तर विजय जगताप, अमोल मुंगळे, बलराज अलाणे व वैभव पवार यांनी रौप्यपदक पटकावले. पॉवरलिफ्टिंगमध्ये रवी मिरगणे यांनी रौप्यपदक पटकावले. बॅडमिंटन दुहेरीत दीपक नाईकवाडे व गुणवंत इप्पर यांना रौप्यपदक मिळाले.
यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक जिवने यांनी खेळाडूंचे अभिनंदन करताना यापुढेही ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर महावितरणचे नाव उंचावतील, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना सर्वतोपरी साह्य करण्याची ग्वाही दिली. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक (मा.सं.) डॉ.शिवाजी तिकांडे यांनी सूत्रसंचालन केले. जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी आभार मानले. कार्यक्रमास नांदेड परिमंडलाच्या उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मंजुषा पारिपेल्ली, कार्यकारी अभियंता प्रसाद महातोले, महेंद्र देशमुख, व्यवस्थापक संजय खाडे, बापू शिंदे, अविनाश चव्हाण यांच्यासह खेळाडू व कर्मचारी उपस्थित होते.
