बीड़कीन भागात घुटखा गुंडांचा परिसरात धुमाकूळ
बीड़कीन/प्रतिनिधी/ पैठण तालुक्यात बीड़कीन हि मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेला घातलेला घुटखा व सुगंधी तंबाखू विक्री करणार्या माफियांनी अक्षरशः हैदोस घातला असून या अवैध चालणार्या घुटखा धंद्या विषयी अन्न, औषध भेसळ प्रशासनाच्या काही अधिकारी व कर्मचारी यांना या धंद्याची अत्यंत माहिती ठेवतात प्रत्येक महिन्याला अशा धंद्यावाल्या सोबत संपर्क होतोच अशी माहिती समोर आली आहे.घुटखा गुंडांनशी फोन वर बोलतात त्यांचा वेगळा कोडवर्ड बोलला जातो. यातून अर्थ पूर्ण संबंध जोपासले जात आहे असे बोलल्या जात आहे. व बीड़कीन येथील गुटखा माफिया कडून एक महिना अगोदर पुढील एक महिन्याचा मेवा मिठाई भेट दिली जाते यात काही कर्मचारी व अधिकार यांमुळे अन्न, औषध भेसळ प्रशासन असून अडचण नसून खोळंबा असून घुटखा गुंडांचा मोठा प्रशासन व राजकिय वरदहस्त असल्याने त्यामुळे कारवाई शून्य.गाव तिथे टपरी, टपरी तेथे घुटखा सहज मिळत असून तरुणपिढी मात्र व्याधींचा आहारी जात आहे. आता गुटखा गुंडांनी नामी शक्कल लढविली असून घुटखयांची तस्कर कंटेनर,आयशर, तवेरा,एर्टीगा, स्कोड़ फॉरचुनर,बेन्ज़्, द्वारे केली जाते.टपरी दुकान व घरपोच घुटखा,ऑनकॉल ही संकल्पना आहे. गुटखा माफिया पोलिस व अन्न, औषध भेसळ विभागाचा नाकावर टिचुन यशस्वी प्रमाणे बिनबोभाट पणे ग्रामीण भागासह तालुक्यातील गावोगावी राबवत आहे.