Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादश्रीकृष्ण नगर (जामवाडी) येथील युवकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

श्रीकृष्ण नगर (जामवाडी) येथील युवकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

श्रीकृष्ण नगर (जामवाडी) येथील युवकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

युवकांचा भाजपमध्ये प्रवेश हा विकासावरचा विश्वास आहे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना/प्रतिनिधी/  श्रीकृष्ण नगर (जामवाडी) ता.जालना येथील युवकांनी आज (ता.१८) रोजी शिवसेनेतून भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या माजी केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वात ठेऊन व भास्कर आबा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी भाजपात प्रवेश केला.

अविनाश मोहिते यांच्या पुढाकाराने व समन्वयातून प्रवेश करणाऱ्यांमध्ये चिमाजी आण्णा पवार, कैलास बाबुराव पवार, तेजेश राजेंद्र धनवटे, सचिन राजेंद्र गुंजाळ, दिपक भगवान गुंजाळ, ज्ञानेश्वर माने, गणेश अशोक मोहिते, सुरज राजू पवार, ओम कैलास कूसळकर, विठ्ठल संतोष पवार, बबलू अवचितराव गुंजाळ, रोहित दिलीप धनवटे, अशोक रामकिसन मोहिते या युवकांचा समावेश.

युवकांचा भाजपमध्ये प्रवेश हा विकासावरचा विश्वास आहे, या युवकांच्या सहभागामुळे पक्ष अधिक सक्षम होणार असून सर्वांगीण विकासाला गती मिळेल असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केले व सर्वांचे पक्षामध्ये मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments