Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादप्रभाग क्रं ७ चे जनतेचा विश्वास जिंकणारा उमेदवारी अर्ज अनंता कुमावत, व...

प्रभाग क्रं ७ चे जनतेचा विश्वास जिंकणारा उमेदवारी अर्ज अनंता कुमावत, व गजाला परवीन पठाण, यांनी दाखल केला

प्रभाग क्रं ७ चे जनतेचा विश्वास जिंकणारा उमेदवारी अर्ज अनंता कुमावत, व गजाला परवीन पठाण, यांनी दाखल केला

आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/  काँग्रेस पार्टी तर्फे प्रभाग क्रमांक ७ चे अधिकृत उमेदवार नगरसेवक पदासाठी अनंता कुमावत, व गजाला परविन परवेज पठाण, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गंगापूर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ७ मध्ये आगामी निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू असताना जनतेच्या मनात एक नाव ठामपणे घोळत आहे अनंता कुमावत, व गजाला परवीन परवेज पठाण, प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि विकासाचा दृष्टीकोन या तीन आधारांवर उभी असलेली ही उमेदवारी प्रभागातील सर्वसामान्य जनतेसाठी आशेचा किरण ठरत आहे. सामाजिक कार्याची भक्कम पायाभूत गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी समानता, न्याय आणि सुविधा या संकल्पनांना प्राधान्य दिले आहे. पाणीपुरवठ्‌यासाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा, अवघड प्रसंगी नागरिकांसोबत उभे राहून दिलासा देणारे कार्य, या उपक्रमांमुळे त्यांनी जनतेच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. प्रभाग क्रमांक ७ च्या प्रभागातील मूलभूत सुविधा शंभर टक्के सक्षम करणे, महिला व युवकांसाठी विकासाच्या नवीन संधी तयार करणे, स्वच्छ आणि सुरक्षित प्रभागाची उभारणी, नागरिकांसोबत सतत संवादातून समस्या सोडवणे, जनतेचा आधार आणि विश्वास अनंता कुमावत यांची विनम्रता, नागरिकांशी जिव्हाळ्याचा संवाद आणि समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने धाव घेण्याची वृत्ती यामुळे प्रभागातील लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. नगरसेवक पदावर निवडून आल्यास प्रभागाचा चेहरा बदलण्यासाठी आपले संपूर्ण योगदान देण्याचा त्यांचा निर्धार आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments