Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादरंगनाथ महाराजांची ११० वी पुण्यतिथी सोहळा संपन्न महाराजांच्या नामस्मरणाने सोहळ्याला दिव्य...

रंगनाथ महाराजांची ११० वी पुण्यतिथी सोहळा संपन्न महाराजांच्या नामस्मरणाने सोहळ्याला दिव्य पावित्र्य लाभले – भास्कर आबा दानवे

रंगनाथ महाराजांची ११० वी पुण्यतिथी सोहळा संपन्न

महाराजांच्या नामस्मरणाने सोहळ्याला दिव्य पावित्र्य लाभले – भास्कर आबा दानवे

जालना/प्रतिनिधी/ नाव्हा (ता. जालना) (ता.१७) येथे आनंदी आत्मानंद सरस्वती उर्फ रंगनाथ महाराजांच्या ११० व्या पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला, यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी महाराजांच्या पवित्र मूर्तीचे दर्शन घेतले तसेच संस्थान तर्फे यावर्षी प्रथमच दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी स्पर्धेत पंचक्रोशीतील २१ गावांतील भक्तांनी हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या नादात मोठ्या उत्साहाने दिंडीत सहभाग नोंदवला.

दिंडी स्पर्धेत धारकल्याण दिंडीला प्रथम, नाव्हा दिंडीला द्वितीय व मौजे आनंदवाडी भजनी मंडळास तृतीय क्रमांक घोषित करण्यात आला.

भास्कर आबा दानवे म्हणाले की, “रंगनाथ महाराजांच्या कृपेने नाव्हा परिसरात भक्तिभाव, हरिनाम आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ होत आहे. दिंडी परंपरा ही आपली सांस्कृतिक ओळख असून अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीत संस्कार, शिस्त आणि भक्तीची भावना जागृत होते. संस्थानतर्फे केलेले आयोजन अत्यंत अनुकरणीय असून पुढील वर्षी दिंडी स्पर्धेला आणखी भव्य स्वरूप देण्यासाठी आपला सर्वतोपरी सहकार्य राहील तसेच पुढील वर्षीच्या दिंडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या दिंडीस माझ्यावतीने रुपये ५१,०००/- रोख देण्यात येणार असल्याची घोषणा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केली.

यावेळी कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष श्री. सिद्धिविनायक मुळे, शिवादादा शेजूळ, विष्णूबापू डोंगरे, देविदास देशमुख, तालुकाध्यक्ष श्री. संजय डोंगरे, मुकेश चव्हाण, सरपंच विष्णू भुतेकर, संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मन कुलकर्णी, सहसचिव अरुण इंगोले, बंडू राजे जाधव तसेच पंचक्रोशीतील असंख्य भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments