आश्रम शाळेत आदिवासी जननायक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी…
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/ आदिवासी जननायक, क्रांतीसुर्य, स्वातंत्र्य सैनिक, धरती आबा अंधश्रद्धा शोषण आणि अन्यायाविरुद्ध उभारलेला उलबुलान जल, जंगल आणि जमीन यांच्या हक्कासाठी आयुष्य अर्पण करणारा महायोद्धा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव पंधरवाडा विजा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा घानेगाव तांडा ता.सोयगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय पाटील व प्राथमिकचे प्रवीण पवार यांनी आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रसंगी वर्षा नारायण राठोड, नंदिनी जगन चव्हाण, सोनाली संतोष राठोड ,लक्ष्मी मनोज राठोड या विद्यार्थिनींनी आदिवासी बंजारा समाजातील पेहराव प्रधान करून वेशभूषा सादर केली. प्रसंगी प्रवीण पवार यांनी मनोगत व्यक्त केले तर ज्येष्ठ शिक्षक सुनील कवीश्वर, देवचंद बागुल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर सलीम तडवी यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी गावातील जगन उत्तम चव्हाण जेष्ठ नागरिक सुमनबाई बाबुराव चव्हाण, सुमनबाई गणेश राठोड, ध्रुपदाबाई गणेश राठोड ,शांतीबाई मांगो चव्हाण हे उपस्थित होते.
तर प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.