Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादआश्रम शाळेत बालदिन व माजी विद्यार्थी संघ मेळावा उत्साहात साजरा..

आश्रम शाळेत बालदिन व माजी विद्यार्थी संघ मेळावा उत्साहात साजरा..

आश्रम शाळेत बालदिन व माजी विद्यार्थी संघ मेळावा उत्साहात साजरा..
आत्ताच एक्सप्रेस 
सोयगाव/प्रतिनिधी/  आश्रम शाळा  घाणेगाव तांडा प्रशालेत  (दि. १४) नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू जयंती बाल दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली , तसेच माजी विद्यार्थी संघ मेळावा घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय पाटील होते तर प्रमुख पाहुणे प्राथमिकचे प्र .मुख्याध्यापक प्रवीण पवार माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विनोद चव्हाण कोषाध्यक्ष संजय जटाळे सदस्य नितीन जैस्वाल ईश्वर चव्हाण अतुल इंगळे सागर चव्हाण होते.
सर्वप्रथम सरस्वतीचे पूजन करून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला. नंतर माजी विद्यार्थी संघातील मान्यवरांचा सत्कार प्रशालेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. प्रसंगी विनोद चव्हाण ईश्वर चव्हाण संजय जटाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील कवीश्वर यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments