जालन्यात वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न
जालना: जिल्हा व मराठवाड्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालय दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी जालना शहरातील अंबड चौफुली येथे सुरू करण्यात आले आहे या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नुकताच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला आहे .यावेळी नवनाथ वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष अँड.अशोक खरात, मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, शंकरराव लिंगे, रामप्रसाद थोरात, डेव्हिड घुमारे,रमाताई होर्शिळ यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा,तालुका,शहर महीला , युवक, सम्यक विद्यार्थी आंदोलन, कामगार आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.