Friday, April 3, 2026
Homeऔरंगाबादआष्टीत अवैध वाळू विक्री, शहरात ढीगारे

आष्टीत अवैध वाळू विक्री, शहरात ढीगारे

आष्टीत अवैध वाळू विक्री, शहरात ढीगारे
 आष्टी/प्रतिनिधी/  परतूर तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा व वाळूची आष्टी शहरात राजरोसपणे विक्री करण्यात येत असून शहरात ठिकठिकाणी बांधकामाच्या जवळ वाळूचे ढीगारे पडलेले दिसून येत आहेत. याबाबत महसूल प्रशासन डीम्म असल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मागील चार वर्षापासून तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून वाळू उपशाची निविदा शासनाने काढलेली नाही. शासनाने वाळू उपसा धोरण बदलले असून वाळूचे डेपो तयार करून तिथून वाळू वितरित करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते, मात्र चार वर्षांमध्ये कुठल्याही तालुक्यात असे डेपो उभारण्यात न आल्याने शासनाची योजना फेल गेली, मात्र परतूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने घरकुल बांधकामासाठी महसूल प्रशासनाद्वारे लाभार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करून गोळेगाव येथील वाळू घाटातून मोफत वाटप करण्यात आली यांतही महसूल प्रशासनाने मध्येच बंद केल्याने घरकुल लाभाथीचे बांधकाम अद्यापही  रखलेले आहे.दरम्यान सद्या वाळू तस्करांचे चांगलेच फावले असून मागील तीन वर्षापासून गोदावरी नदी पात्रातून वाळू तस्कर बिनधास्तपणे दिवसरात्र वाळूचा उपसा करून त्याची सर्रासपणे ४० ते ५० हजार रुपयांना टिप्पर (हायवा )याप्रमाणे विक्री करत आहेत. परतूर तालुक्यात किमान पाच ठिकाणाहून गोदावरी पात्र व दुधना नदी पात्र येथून उपसा हा बिन दिक्कतपणे करण्यात येतो त्यामध्ये स्थानिक प्रशासनाचे सहकार्य व लागेबांधे असल्याने कुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. वाळू तस्करांचे व प्रशासनातील काही लोकांचे लागेबांधे असल्याने तालुक्यासह आष्टी शहरात देखील ठिकठिकाणी श्रीमंत व्यक्तींच्या बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी वाळूचे ढिगारे अचानकपणे रात्रीचे येवून पडलेले दिसून येतात. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी घरकुल बांधकाम रखडलेल्या लाभार्थ्यांकडून होत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments