युवा नेतृत्व शितू भाऊ सेवनकर यांच्या मातोश्री सुरेखा केवळदास सेवनकर यांच्या नावाची वार्ड क्रमांक १ मधून नगरसेविका म्हणून चर्चा
हिमायतनगर/प्रतिनिधी/ हिमायतनगर शहरात नगरपंचायत निवडणुका घोषित झाल्यानंतर अनेक नगरसेवक व इच्छुक उमेदवार समोर येत आहेत असे असले तरी हिमायतनगर शहराचे बहुचर्चित असलेले शितल भाऊ सेवनकर हे भारतीय जनता पार्टी मधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर भावी नगरसेवक म्हणून चर्चेस उधान येत आहे,
शितल सेवन करके हिमायतनगर शहरात भारतीय जनता पार्टीचे उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून बहुचर्चित असले तरी काही कारणास्तव त्यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर व आरक्षणाची सोडत झाल्यानंतर त्यांची वार्ड क्रमांक १ मधून नगरसेवकाची भूमिका भक्कम झाल्याचे दिसून येते, भारतीय जनता पार्टीत असते वेळेस एक युवा नेतृत्व म्हणून शितल भाऊ सेवन कर हे हिमायतनगर तालुक्यातील जनतेच्या संपर्कात असल्याने त्यांना चाहता वर्ग एक मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते हिमायतनगर शहरातील गोरगरीब व्यक्तीसाठी व गरजू व्यक्तींच्या कामात येणारा एक युवा नेतृत्व म्हणून शितल भाऊ सेवन कर यांच्याकडे बघितले जाते, यामुळे हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक एक मधील नागरिकांनी व युवा वर्गाने त्यांना या निवडणुकीत उभे राहण्यास भाग पाडले असल्याचीही चर्चा हिमायतनगर शहरात ऐकण्यास मिळत आहे.