Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादसेवानिवृत्त होऊन जन्मभूमीत परतलेला जवानाचा गावकऱ्यांकडून सत्कार

सेवानिवृत्त होऊन जन्मभूमीत परतलेला जवानाचा गावकऱ्यांकडून सत्कार

सेवानिवृत्त होऊन जन्मभूमीत परतलेला जवानाचा गावकऱ्यांकडून सत्कार

आडगाव बुद्रुक/ भारतीय सैन्यात गेली १७ वर्षे सेवा बजावणारे आडगाव बुद्रुकचे (ता.फुलंब्री) सुपुत्र सतीश भास्कर भुमे हे भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाले.देशसेवा करत सेवानिवृत्त होऊन फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रुक (ता.फुलंब्री) येथील जवान सतीश भास्कर भुमे आपल्या जन्मभूमीत परतताच गावकऱ्यांनी त्याचे मोठ्या हर्षोल्हासात स्वागत करून शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
जवान सतीश भुमे १० ऑक्टोबर २००८ ला भारतीय सेनेत सामील झाले होते.त्यांनी जम्मू काश्मीर, गुजरात, बांगलादेश येथील बॉर्डरवर १७ वर्षे देशसेवा केली. नुकतेच ते सेवानिवृत्त झाले. त्याचे कुटुंब आडगाव बुद्रुक (ता.फुलंब्री) येथे राहत असल्याने ते स्वगृही परतले. आपल्या गावातील जवानाने भारतीय सेनेत १७ वर्षे सेवा देऊन देशसेवा केली. स्वतःच्या जीवाची परवा न करता बॉर्डरवर रात्रंदिवस पहारा दिला. या भावनेने आडगाव बुद्रुकवासीयांचा ऊर भरून आला. ते स्वगृही येताच गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत करून त्याचा सत्कार केला.
तसेच गावातील देशसेवेतून सेवा निवृत्त झालेले जवान विलास भुमे,महाराष्ट्र पोलिस दत्तू शिंदे,महसूल विभाग मारुती धोंडकर,तर शाळा कर्मचारी रामदास भुमे,हे सर्व सेवेतून निवृत्त झाल्या बद्दल गावकरी मंडळी यांच्या वतीने त्यांचा सुध्या सत्कार करण्यात आला.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments