Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादखुलताबाद नगरपरिषद निवडणुकीत एम आय एमची एन्ट्री,स्वबळाची चाच पणी..

खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीत एम आय एमची एन्ट्री,स्वबळाची चाच पणी..

खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीत एम आय एमची एन्ट्री,स्वबळाची चाच पणी..

 

खुलताबाद/प्रतिनिधी/ नगरपरिषद निवडणुकीत एम आय एम स्वतंत्रपणे लढणार, अशी माहिती प्रदेश महासचिव समीर बिल्डर  यांनी दिली.एम आय एम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे.ते म्हणाले की, खुलताबाद  नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष उमेदवारासह ७  प्रभागात एम आय एम पक्षाचे उमेदवार उभे करणार आहे प्रभागातील आरक्षण निहाय उमेदवार उभे करण्याची तयारी झाली आहे.युवकांना उमेदवारी देण्यास प्राधान्य असणार, असे समीर बिल्डर यांनी सांगितले.
खुलताबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून युवकांसाठी सुवर्णसंधी आहे.एम आय एम या युवकांना सोबत घेऊन निश्चितच शहराचा विकास करेल, असा विश्वास  एम आय एम पक्षाचे प्रदेश महासचिव समीर बिल्डर यांनी व्यक्त केला. पक्षश्रेष्ठींनी सांगितल्या प्रमाणे खुलताबाद  नगरपरिषदेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे. इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागणी अर्ज भरून देण्याचे आवाहन समीर  बिल्डर यांनी केले. यावेळी मतीन जागीरदार हबीबोदिन
मुशीरोद्दीन कामरानोद्दीन आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते
नगरपरिषद निवडणुकीसाठी एम आय एम पक्षांमध्ये  हालचालींना वेग.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments