राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रभाग १० मधून संतोष अंबिलवादे यांची जोरदार तयारी
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ गंगापूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची जोरदार धामधूम सुरू झाली आहे. गंगापूर प्रभाग क्रमांक १० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते संतोष अंबिलवादे यांनी आपला जनसंपर्क मोहिमेला वेग दिला आहे. समाजकार्यातील भक्कम पायाभूत अनुभव, लोकांशी असलेलं मैत्रीचं नातं आणि तरुण नेतृत्वाचा उत्साह यामुळे त्यांचा प्रचार प्रभागात चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही वर्षांपासून अंबिलवादे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली
शहरातील जनतेसाठी विविध उपक्रम राबवले आहे.
सध्या प्रभागातील प्रत्येक भागात ते घरोघरी भेट देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. महिला बचतगट मेळावे, युवक संवाद कार्यक्रम आणि वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या बैठकींमधून त्यांनी प्रचाराला नवी दिशा दिली आहे. स्थानिक नागरिकांच्याही कार्यपद्धतीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंबिलवादे यांचा प्रचार अधिक जोरदार होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.