Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादकुष्ठरुग्ण शोध अभियान

कुष्ठरुग्ण शोध अभियान

 

कुष्ठरुग्ण शोध अभियान

          कुष्ठरुग्णांचा प्रसार थांबविण्यासाठी शोध मोहिम 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 सहसंचालक आरोग्य सेवा, (कुष्ठरोग व क्षयरोग) पुणे यांच्या आदेशान्वये कुष्ठरुग्ण शोध मोहिम आपल्या जिल्हयात दि.17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या दरम्यान राबविण्यात येणार आहे. सन 2027 पर्यंत शुन्य कुष्ठरुग्ण प्रसार हे उदिद्ष्ट केंद्र शासनाने निश्चित केले आहे. हे उदिद्ष्ट साध्य करण्यासाठी समाजातील सर्व लपलेले कुष्ठरुग्ण शोधुन त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे आवश्यक आहे. त्याकरिता या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणामध्ये कुष्ठरुग्ण तपासणी आशा व पुरुष स्वयंसेवक यांच्या पथकाद्वारे संपुर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती हवी असल्यास सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), जालना यांना संपर्क साधावा.

लक्षणे :- त्वचेवर लालसर फिकट न खाजणारा, न दुखणारा, बधीर चट्टा, तेलकट त्वचा, त्वचेवर गाठी, कानाच्या पाळ्या जाड होणे, त्वचेला थंड व गरम संवेदना न जाणवणे, हाता पायाची बोटे वाकडी, मज्जातंतु जाड होणे व मज्जासंस्थेचे रोग. असे लक्षणे आढळुन आल्यास शासकिय रुग्णालयामध्ये तपासणी करुन घ्यावी. रोगनिदान व औषधोपचार शासकिय रुग्णालयामध्ये मोफत आहे.

 प्रसार :- कुष्ठबाधित रुग्णांच्या खोकला/शिंकाद्वारे मायकोबॅक्टेरियम लेप्री जिवाणु हवेमध्ये पसरतात. श्वसनप्रक्रिया मध्ये निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये मायकोबॅक्टेरियम लेप्री जिवाणु प्रविष्ठ होतात. दुषित हवेद्वारे कुष्ठरोगाचा प्रसार होतो. कुष्ठरोग बाधित व्यक्ती सोबत जवळचा संपर्क असल्यास त्याचा प्रसार होतो. कुष्ठरोगाविरुध्द लढण्याच्या नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीमुळे बहुतांश लोकांना (९८ टक्के) कुष्ठरोग होत नाही. कुष्ठरोग कोणालाही होऊ शकतो.

अधिशयन काळ : ६ महिने ते १० वर्षे. रोगनिदान :- बाहय शारीरिक तपासणी उदा. त्वचेवर लालसर फिकट न खाजणारा, न दुखणारा, बधीर चट्टा तपासणी, कानाच्या पाळया जाड, भुवयांचे केस विरळ, हाता पायाची बोटे वाकडी पाहणी, बायोप्सी.

प्रकार :- कुष्ठरोगाचे दोन प्रकार आहेत १) पी.बी.(पॉलीबॅसिलाय) व २) एम.बी.(मल्टीपल बॅसिलाय). औषधोपचार :- सर्व शासकिय रुग्णालयात रोगनिदान व औषधोपचार मोफत उपलब्ध आहे. एम.डी.टी.औषधोपचार पध्दती आहे. पी.बी.केस मध्ये ०६ महिने औषधोपचार दिला जातो. यामध्ये टॅब.डापसोन, रिफामायसिन दिल्या जातात. पी.बी.केस असंसर्गजन्य आहे. एम.बी.केस मध्ये १२ महिने औषधी दिली जाते. यामध्ये टॅब.डापसोन, रिफामायसिन व क्लोफायझीमीन दिल्या जातात. एम.बी.केस संसर्गजन्य आहे. पी.बी.केस मध्ये १ ते ५ चट्टे व एम.बी.केसमध्ये असंख्य चट्टे असतात. कुष्ठरोगामुळे अंधत्व, किडनीविकार, स्नायु कमकवुत, कायमचे हाताचे/पायाचे बोटे नष्ट होते, मज्जातंतुचे नुकसान होते, चेहरा विकृतीग्रस्त होतो.

गैरसमज :- कुष्ठरोग अनुवांशिक नाही. कुष्ठरोग हा शाप नसून जिवाणुमुळे होणार रोग आहे. सामाजिक घटक :- गरीबी, वैयक्तीक अस्वच्छता, गर्दी. प्रतिबंध :- बी.सी.जी. लस घेतल्यामुळे ५० टक्के कुष्ठरोगापासुन संरक्षण मिळते. आरोग्यदायक वातावरण ठेवणे, विटामीन अे,सी,डी,इ, बी-१२ व खनिज झिंक, मॅग्नेशियम व शिलेनियम चे प्रमाण व्यवस्थित ठेवणे. कुष्ठबाधित व्यक्तीचे लवकरात लवकर निदान करुन एम.डी.टी.औषधोपचाराखाली आणणे. एम.डी.टी.औषधोपचार प्रणालीमुळे कुष्ठरोग पुर्णपणे बरा होतो. आवाहन :- दिसता अंगावर चट्टा डॉक्टरला भेटा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments