Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादगंगाबाई कदम यांचे वृद्धापकाळाने निधन

गंगाबाई कदम यांचे वृद्धापकाळाने निधन

गंगाबाई कदम यांचे वृद्धापकाळाने निधन

धर्माबादचे ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना मातृ शोक
धर्माबाद/प्रतिनिधी/ धर्माबाद येथील ज्येष्ठ पत्रकार,व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा निराधार योजना समितीचे माजी सदस्य संजय कदम यांच्या मातोश्री गंगाबाई तुळशीराम कदम यांचे वृद्धापकाळाने रात्री एक वाजता निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पार्थिवावर दि. o५ नोव्हेंबर २०२५ दुपारी तीन वाजता धर्माबाद येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पक्षात पश्चात तीन मुले, तीन मुली, जावई,सुना, नातवंडे, असा मोठा परिवार असून भोकर येथील बिंदू महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. जे.टी. जाधव, तथा तेलंगाना राज्यातील माइन्स डिपार्टमेंटचे संचालक जी. संजय कुमार यांच्या त्या सासूबाई होत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments