Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादशहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी शेख महेमूद यांंची निवड अरविंद अण्णा चव्हाण...

शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी शेख महेमूद यांंची निवड अरविंद अण्णा चव्हाण यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान

शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी शेख महेमूद यांंची निवड
अरविंद अण्णा चव्हाण यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान

जालना/प्रतिनिधी/  जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पाट (अजित दादा पवार गट) च्या शहर जिल्हाध्यक्षपदी समाजमनाला आपलेसे करणारे, फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे ज्येष्ठ नेते आणि कुशल संघटक शेख महेमूद यांची निवड करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी पत्राद्वारे ही नियुक्ती केली असून बुधवारी जालना येथील पक्ष कार्यालयात माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यापूव काँग्रेस पक्षात महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे शेख महेमूद यांनी काही दिवसांपूवच काँग्रेसच्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा दीर्घ कार्यकाळ, सर्वसमावेशक नेतृत्व शैली आणि समाजघटकांमध्ये असलेला व्यापक संपर्क पाहता ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 25 वर्षांहून अधिक काळ त्यांनी काँग्रेस पक्षात विविध पदांवर राहून संघटन बांधणीचे काम केले. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रिय असून फुले-शाहू-आंबेडकर विचारांनी प्रेरित लोककल्याणाचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींना शेख महेमूद यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार पक्ष नेतृत्वाने त्यांना शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. या प्रसंगी माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी आमदार शिवाजीराव चोथे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, प्रदेश सरचिटणीस रवींद्र तौर, अण्णासाहेब खंदारे तसेच विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. नियुक्ती स्विकारल्यानंतर शेख महेमूद यांनी पक्षावर विश्वास ठेवल्याबद्दल नेतृत्वाचे आभार मानले व जालना शहरातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व संघटना दमदार करण्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शेख महेमूद यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पक्षात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments