गंगापूर नगरपालिकेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर शहरातील काही ठिकाणी पाणीपुरवठा ठप्प
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर नगरपालिकेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर शहरातील पाणीपुरवठा ठप्प नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. मागील काही महिन्यापासून गंगापूर शहरातील पाणीपुरवठा वेळेनुसार होत नाही. काही प्रभागात आठ दिवसाला तर काही प्रभागात पंधरा दिवसाला तर काही ठिकाणी महिन्याला एका वेळेस पाणीपुरवठा होत असल्याचे बोलले जात आहे. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा आठ ते दहा पंधरा दिवसानंतर एक वेळेस पाणीपुरवठा केला जातेय नदी आहे उशीला आणि कोरड आहे घशाला अशी परिस्थिती गंगापूर शहरातील नागरिकांची झाली आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे दैनिक आत्ताच एक्सप्रेस चे प्रतिनिधी सुभान शहा यांनी पाणीपुरवठा अभियंता यांना फोन करून संपर्क साधण्याचा केला त्यांच्याकडून बोलण्यात आले की दोन तासात पाणीपुरवठा चालू होईल परंतु पूर्ण दिवस गेला तरी देखील पाणीपुरवठा चालू करण्यात आला नाही. सदर पाणीपुरवठा वेळेनुसार होत नाही याची माहिती घेण्यासाठी पाणी सोडणारे कर्मचारी यांना देखील फोन करून माहिती विचारण्याचा प्रयत्न केला कर्मचाऱ्या कडून बोलण्यात आले की मुख्य पाईपलाईन फुटलेली आहे त्यामुळे पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाही. पाणीपुरवठा सुरळीत का केले जात नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे. गंगापूर शहरातील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जागोजागी फुटलेली आहे. नगरपालिकेच्या वतीने हे फुटलेली पाईपलाईन दुरुस्ती करण्यात येते परंतु ती पुन्हा नेहमी फुटत असते यामुळे पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या दुरुस्ती करता येत नाही का? असं प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित झाला आहे. पाईपलाईन दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा ती पाईपलाईन फुटत असते याला कारण काय पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्या.