पैठण चे भूमिपुत्र जवान सुनील अण्णासाहेब शहाराव यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम अगदी उत्साहात संपन्न!
पिंपळवाडी/प्रतिनिधि/ पैठण तालुक्यातील ईसारवाडी येथील भूमिपुत्र जवान सुनील अण्णासाहेब शहाराव यांनी भारत देशाच्या सियाचीन, पाकिस्तान बॉर्डर व चायना बॉर्डर तसेच संयुक्त राष्ट्र संघटन यांच्यामार्फत शांतिदुत म्हणून साउथ आफ्रिका येथील सुडान या देशामध्ये उत्कृष्ट ३ वर्ष सेवा करून सागर येथील महार रेजिमेंट सेंटरमध्ये भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले आहे. देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्ने असतात. पण हे स्वप्न प्रत्येकाचंच पूर्ण होत नाही. सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतातपण सैनिक जेव्हा देशसेवा करुन पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरुन येतात असाच एक क्षण पैठण तालुक्यातील ईसारवाडी येथील भूमिपुत्र सुनील अण्णासाहेब शहाराव यांचा पाहायला मिळाला 17 वर्ष देशाचे रक्षण करून सुखरूपपणे घरी पुन्हा एकदा आल्याचे पाहून प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरुन येतं होते सुनील शाहराव यांनी 17 वर्ष सीमेवर देशसेवा केली. सेवानिवृत्त होऊन गावी आल्यानंतर गाडीमध्ये बसून डीजेच्या तालावर वाजत गाजत गावकरी मित्र नातेवाईकांनी व पंचक्रोशीतील नागरिकांनी हजेरी लावली होती त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल यात सर्वात जास्त आनंद होता तो म्हणजे जवानाच्या कुटुंबीयांना आतुरतेने वाट पाहत होते. जवानाचा गावात प्रवेश होताच तोफांची सलामी देऊन कुटुंबाच्या वतीने गोड भरवून त्यांचं औक्षण करण्यात आलं. 17 वर्ष देश सेवा करून सुखरूप गावी आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.