Sunday, September 27, 2026
Homeऔरंगाबाददाम्पत्यांचा केला जातो सत्कार :जरंडी ग्रामपंचायत मुलीच्या जन्माचे स्वागत करणारे गाव;-जरंडी

दाम्पत्यांचा केला जातो सत्कार :जरंडी ग्रामपंचायत मुलीच्या जन्माचे स्वागत करणारे गाव;-जरंडी

दाम्पत्यांचा केला जातो सत्कार :जरंडी ग्रामपंचायत
मुलीच्या जन्माचे स्वागत करणारे गाव;-जरंडी
आत्ताच एक्सप्रेस 
सोयगाव/प्रतिनिधी/ मुलगा, मुलगी एक समान असेही कितीही म्हटले जात असले तरी काही ठिकाणी अजूनही मुलीबाबत भेद केला जातो. पण हा भेदभाव कायमचा दूर व्हावा, मुलाप्रमाणेच मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे, मुलगाच हवा ही मानसिकता बदलावी, मुलीच्या जन्मानंतर कुटुंबात तिचेही स्वागत व्हावे यासाठी सोयगाव तालुक्यातील जरंडी हे गाव गेल्या चार दोन वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. एखाद्या कुटुंबात पहिली मुलगी जन्मास आल्यास त्या कुटुंबाला १५०० रुपये ग्रामपंचायततर्फे दिले जाते. एवढेच नव्हे तर तिच्या आई-वडिलांचा कार्यक्रम आयोजित करून सत्कार केला जातो. त्यामुळे मुलीच्या जन्माचे स्वागत करणारे गाव अशी ओळख या गावाची तालुक्यात होऊ लागली आहे.
ग्रामपंचायतच्या माध्यमातूनही गाव विकास साधून. अनेक लोकाभिमुख योजनाही ग्रामपंचायत व लोकसहभागातून साध्य केल्या आहेत. परंतु लोकांच्या कल्याणासाठी आणि ग्रामपंचायतच्या वतीने गावकऱ्यांत एक सामाजिक सलोखा निर्माण करता यावा. त्या दिशेने जरंडी ग्रामपंचायतचे सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील,वंदना ताई पाटील,नीलिमा पवार व ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांच्या प्रेरणेतून विविध लोकोपयोगी योजना  ग्रामपंचायत राबवीत आहे.
गावातील एखाद्या कुटुंबात प्रथम मुलगी जन्माला आल्यास १५०० रुपये रोख व त्या मातेच्या सत्कार केला जातो. गावातील कुणाच्या कुटुंबातील व्यक्ती मृत पावल्यास तत्काळ मदत म्हणून पंधराशे रुपये दिले जातात. तर गावातील मुलीचे लग्न झाल्यानंतर माहेर भेट म्हणून अकराशे रुपये दिले जातात. मराठवाडा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमात दोन मातांचा सत्कार करण्यात आला. तसेच माहेर भेट म्हणून अकरा महिलांना माहेर भेट म्हणून ११०० रुपयाच्या धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील सामाजिक सलोखा निर्माण व्हावे, आपल्या गावाप्रती आपुलकीची भावना निर्माण व्हावी, मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जाऊ नये, महिलांचा सन्मान व्हावा हा या मागील उद्देश असल्याचे सरपंच स्वाती पाटील यांनी सांगितले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments