Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादजगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी फर्दापूर - धम्माचल परिसरात...

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी फर्दापूर – धम्माचल परिसरात…

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी
फर्दापूर – धम्माचल परिसरात…
२० वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे ५ नोव्हेंबरला आयोजन…
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/ धम्माचल अजिंठा लेणी फर्दापूर येथे दि. ५ रोजी कार्तिक पौर्णिमा निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझम या संथेच्या वतीने अखिल भारतीय  भिख्खु  संघाचे कार्याध्यक्ष भदंन्त डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली
दक्षिण कोरिया येथील भिख्खु संघाच्या उपस्थितीत २० वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन
करण्यात आले आहे.या धम्मपरिषदेला बौध्द उपासक उपासिकांनी मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आव्हान
करण्यात आले आहे.
या परिषदेची सुरूवात  सकाळी ठीक दहा वाजता धम्माचल येथे डॉ.ली ची रान डोंग  बँग बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी दक्षिण कोरिया यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण.करून सुरूवात होनार आहे. व दुपारी बारा वाजता अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे मुख्य मंडपात उद्घाटन करण्यात येनार आहे. या परिषदेचे अध्यक्ष रस्ते विकास महामंडळ चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक व धम्माचल ट्रस्टचे उपाध्यक्ष इंजिनीयर डॉ. अनिल कुमार   गायकवाड हे असणार आहेत. परिषदेचे उद्घाटन भदंन्त मास्टर ली चंग बे यांच्या हस्ते होनार  आहे. व  धम्माचल स्मरणिकेचे प्रकाशन  भदंन्त मायौन बे यांच्या हस्ते करण्यात येनार आहे. या वेळी
प्रमुख अतिथी म्हणून भदंन्त मास्टर लिंम  मु सोंग.
भिक्खू डॉ.फ्र  आच न सिटी चोक सोमवरन.वट महा ताट. व  सिने अभिनेते गगन मलिक यांची उपस्थिती असनार आहे. व दक्षिण कोरिया येथील माजी राज्यपाल किम डू कॉन. व थायलंड येथील एम सीड्स फाऊंडेशनचे अध्यक्ष सिरीय क फाटरा फ्रसीट मैत्री सामाजिक धार्मिक कार्यकर्ते सिद्धार्थ हत्ती आंबीरे हे असणार आहेत. व प्रमुख धम्मदेशना भदंत धम्म सेवक महाथेरो अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भिकू संघ. भदंत शरणानंद महाथेरो पाथरी.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments