Saturday, November 1, 2025
Homeऔरंगाबाददेशमुख नगर जैन मंदिरात पिच्छी परिवर्तन समारंभ सपन्न

देशमुख नगर जैन मंदिरात पिच्छी परिवर्तन समारंभ सपन्न

देशमुख नगर जैन मंदिरात   पिच्छी परिवर्तन समारंभ  सपन्न

छत्रपती सभाजीनगर/ भव्य पिच्छी परिवर्तन समारंभ उपाध्याय श्री विरंजन सागर जी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री १००८ भगवान मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर, देशमुख नगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये महिलांनी आपल्या डोक्यावर पिच्छी ठेवून सहभाग घेतला. महाराष्ट्रातील ढोल-ताशांच्या गजरात आणि बँडच्या तालावर शोभायात्रा मडपामध्ये पोहोचली.
 यावेळी रुपाली रावका यांनी मगलाचरन केले. दीपप्रज्वलन जबलपूरहून आलेल्या श्रावक व मुनिश्री विसोमयसागरजी यांच्या उपस्थितीत त्यांच्या आई वडील याचा हस्ते करण्यात आले.
आचार्य गुरु विराग सागरजी यांच्या संगीतमय मंगल पूजनात सर्व महिला मंडळांनी सहभाग घेतला.  यावेळी आचार्य श्री प्रणाम सागरजी, उपाध्याय श्री विरंजन सागरजी महाराज   मुनिश्री प्रभाव सागरजी, मुनिश्री विनिशोध सागरजी, मुनिश्री विसोमयसागरजी  महाराज आदीचे  पादप्रक्षालन सपन्न झाले
मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण व अपारंपरिक ऊर्जा विभागाचे माननीय श्री अतुल सावे उपस्थित होते. सकल जैन समाज व मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट समितीने उपाध्याय श्रींना “जिन धर्म प्रभावित” ही उपाधी देऊन सन्मानित केले.
माताजी विशीला श्री यांची जुनी पिच्छी रेखा जैन (इंदौर) यांना प्राप्त झाली. विसोमयसागर महाराज यांची पिच्छी रचना ऋषभ जैन (सुरत) यांना मिळाली. मुनि विनिशोध सागरजी महाराज यांची पिच्छी कविता विनोद पाटनी यांना प्रदान करण्यात आली. उपाध्याय श्री विरंजन सागरजी यांची पिच्छी प्रदीप पाटनी व विनीता पाटनी यांना मिळाली.
या कार्यक्रमात जबलपूर, सागर, दमोह, दिल्ली, हरियाणा, रोहतक, इंदौर येथील श्रावकांनी उपस्थित राहून पुण्य प्राप्त केले. यावेळी भंडाऱ्याचे आयोजन श्रीमती प्रमिला सुभाष जैन (रावका परिवार) यांनी केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments