Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादगुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर मध्ये सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर मध्ये सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर मध्ये सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

 

खुलताबाद/प्रतिनिधी/ वेरूळ: येथील गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर मध्ये प्रशालेचे क्रीडा शिक्षक आशिष देवकुमार कान्हेड यांच्या मातोश्री जया देवकुमार कान्हेड यांच्या स्मरणार्थ गत पंधरा वर्षा पासून सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेचे ज्ञान व्हावे या अपेक्षेने संपूर्ण शालेय स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यासाठी प्रशालेतून सर्व शिक्षकांचा प्रायोजक म्हणून सहभाग असतो आज या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडले . यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक निर्मल कुमार ठोले हे अध्यक्षस्थानी होते.तर प्रमुख अतिथी म्हणून चैतन्य कुमार वायकोस, चंदना वायकोस, सचिन चतुर,रमेश चतुर सुनंदा चतुर्, सुभाष चतुर, आशिष कान्हेड, तसेच संगीता गवळी प्रशालेचे मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर पर्यवेक्षक सुकमार नवले यांची उपस्थिती होती.यावेळी दैनंदिन परिपाठ अंतर्गत विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये माध्यमिक विभागातून व प्राथमिक विभागातून गुणानुक्रमे प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मरण चिन्ह व रोख राशी देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्राथमिक गटातून तेजल योगेश गुशिंगे, स्वरा युवराज काळे, शिवम सदाशिव साबळे, तर माध्यमिक गटातून प्रांजल परमेश्वर पगारे, पवन धारासिंग राठोड, रोहन रमेश धरणे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त केला तसेच प्रत्येक वर्गातून सामान्य ज्ञान स्पर्धेच्या प्रश्नांची उत्कृष्ट वही लेखन करणाऱ्या 158 विद्यार्थ्यांना गौरवांवित करण्यात आले. या यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबचंद बोराळकर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांना मध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून रोख स्वरूपात पारितोषिकांची घोषणा केली. या स्पर्धेसाठी सहप्रायोजक म्हणून निर्मळ ठोले गुलाबचंद बोराळकर सुकुमार नवले शोभा देशमाने सुहास निश्चित घोटकर महेंद्र वाकळे, दीपक जैन, सचिन अन्नदाते, कैलास गोरे, सिद्धी दगडे, सुरज मेहेत्रे, प्रतिभा गंगवाल, प्रदीप माद्रप, प्रतीक्षा दगडफोडे, संतोष जैन यांनी सहप्रयोजकत्व स्वीकारले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र वाकळे व राजकुमार नरखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जयश्री पाटणी यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments