राममूर्ती ता.जालना येथील अनेक शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश!
जालना/प्रतिनिधी/ मा. केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राममूर्ती येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे अनेक कार्यकर्ते भाजपात दाखल झाले.
या पक्षप्रवेश सोहळ्यात माजी उपसरपंच श्री. निवृत्ती रामप्रसाद मुळे, श्री. भाऊसाहेब काशिनाथ गिराम आणि श्री. संतोष विश्वनाथ गिराम यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या वेळी तालुकाध्यक्ष श्री. संजय डोंगरे, श्री. वसंत शिंदे, श्री. नागेश अंभोरे, श्री. योगेश शिंमगे, श्री. शेलार गिराम, श्री. निवृत्ती लंके, श्री. राजाराम राजे जाधव, ज्ञानेश्वर उगले आणि अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
