Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादखुलताबाद शहरातील मोठी अळी येथील घटना याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची...

खुलताबाद शहरातील मोठी अळी येथील घटना याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

खुलताबाद शहरातील मोठी अळी येथील घटना याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

११ केव्ही हायटेंशन विद्युत तारेचा शॉक लागून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू; शहरातील मोठी आळीतील दुर्दैवी घटना.
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद शहरातील मोठी आळी परिसरात ११ केव्ही हायटेंशन विद्युत तारेचा शॉक झाल्याने १४ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ३) घडली. राणी सोमीनाथ घोरपडे (वय १४, रा. मुळगाव चिकलठाण, ता. कन्नड) असे मृत मुलीचे नाव आहे. राणी घोरपडे सद्गुरु गॅस एजन्सी समोर,मोठी आळी येथील सदाशिव पवार यांच्या घरी गेल्या पाच वर्षांपासून आपल्या कुटुंबासह भाड्याने राहत होती.याच ठिकाणी कामा निमित्त तिचे कुटुंब खुलताबादमध्ये वास्तव्यास आहे. गुरुवारी दुपारी ती घराबाहेर असताना अचानक ११ केव्ही हायटेंशन तारेला स्पर्श झाला आणि तिला जोरदार विद्युत धक्का बसला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर राणीला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. डॉ. वैशाली बोधनकर यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. अंत्यविधी खुलताबाद येथे करण्यात आला.
खुलताबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सिद्धार्थ सदावर्ते व शेख जाकीर करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments