Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादअंहकार देऊळगांव येथील रस्ता डांबरीकरण करा, अन्यथा आंदोलन

अंहकार देऊळगांव येथील रस्ता डांबरीकरण करा, अन्यथा आंदोलन

अंहकार देऊळगांव येथील रस्ता डांबरीकरण करा, अन्यथा आंदोलन

जालना/प्रतिनिधी/ जालना तालुक्यातील अंहकार देऊळगांव येथील रस्त्याच्या अत्यंत दुर्दशा झाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहे. सदरील रस्ता पंतप्रधान सडक योजना किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत सिंमेट काँकीट किंवा डांबरीकरण रस्ता तयार करावा अशी मागणी सुरेश रत्नपारखे, मॉ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी जालना यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, जालना तालुक्यातील अहंकार देऊळगांव येथील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. य रस्त्यावर मोठमोठ्ठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यात पडून अपघात होण्याची शक्यता आहे. तरी सदरील अंहकार देऊळगांव येथील रस्ता डांबरीकरण करावा, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा   दिला. या निवेदनावर काळुराम घोडके, रमाकांत खरात, गोटु खरात, अमोल खरात यांची नावे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments