देशमूख नगर येथे आठ दिवसीय सिद्धचक्र महामंडल विधानास धर्म ध्वजारोहणाने प्रारभ
छत्रपती सभाजी नगर /प्रतिनिधी/ 1008 मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर , 108 उपाध्याय विरंजन सागर जी महाराज ससंघ सानिध्या मध्ये आठ दिवसीय श्री श्री सिद्धचक्र महामंडळ विधानाचे आयोजन करण्यात आले सुरुवात आजपासून
3 जुलै 2025 रोजी झाली सकाळच्या सत्रात भगवंताचे अभिषेक, पूजन , धर्म ध्वजारोहण, तदनंतर विधानासाठी सौधर्म इंद्र, कुबेर इंद्र, यज्ञ नायक आणि इतर इंद्रांचे निवङ झाली यामध्ये इंद्राचा मान सौ. शीला झुंबरलालजी. रावका परिवार , सौ रिचा विनीत लोहाडे, सो मोहिनी अजित पाटणी , सौ वैशाली नितीन छाबडा व सौ सुषमा रमणलाल पाटणी यांना इंद्र आणि इंद्रायणी बनण्याचा मान मिळाला व धर्म ध्वजारोहण करण्याचा मान सौ. प्रिया राहुल शहा परिवार तसेच मंडप उदघाटन सौ ज्योती धरमचंदजी पहाडे यांना मिळाला यावेस शांती आणि सुख प्राप्तीसाठी सिद्धचक्र विधानाचे आयोजन केले आहे असे उपाध्याय विरंजन सागर जी महाराज यानी विधाना प्रंसगी ऊदगारले विधानाच्या यशस्वीतेसाठी समस्त देशमुख नगर आणि संभाजीनगर दिगंबर जैन समाज परिश्रम घेत आहेत