Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादएमजीएम विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाची यशस्वी वाटचाल अनेक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

एमजीएम विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाची यशस्वी वाटचाल अनेक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

एमजीएम विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाची यशस्वी वाटचाल

अनेक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

छत्रपती संभाजीनगर, दि.२८ : एमजीएम विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे. यामध्ये प्रतीक प्रवीण पाटील आणि महेश विकास पाटील यांची रेनी लाईफ सायन्सेस अंकलेश्वर तसेच प्रतीक छोटूलाल पाटील व मयूर भरत पाटील यांचे सर्वायवल टेक्नॉलॉजी लिमिटेड वलसाड गुजरात या ठिकाणी कॉलिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. तसेच हर्षवर्धन संतोष पाटील याचे संत रामदास इन्फ्रास्ट्रक्चर छत्रपती संभाजीनगर येथे क्वालिटी कंट्रोल केमिस्ट  म्हणून निवड झालेली आहे.

याचबरोबर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील विद्यार्थी देखील वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये पूजा प्रवीणराव राजापूरकर ही ज्युनियर रीसर्च असोसिएट म्हणून डिपार्टमेंट ऑफ प्रायोर आर्ट, इगर टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस येथे कार्यरत आहे. रक्षा संजय जाधव ही ट्रेनिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून मॅन एनर्जी सोल्युशन, वाळूज एमआयडीसी येथे कार्यरत आहे. जयवंत मधुकर पाटील कॉलिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून एफडीसी लिमिटेड, वाळूज एमआयडीसी येथे तो कार्यरत आहे तसेच जयराम सूर्यकांत ठोसर हा रिसर्च अँड डेव्हलपमेंट केमिस्ट म्हणून ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड, ठाणे येथे सध्या कार्यरत आहे.

रसायनशास्त्र विभागातील सोहेल चाऊस हा विद्यार्थी  उच्च शिक्षणासाठी भारत सरकारच्या आईझर (IISER) भोपाळ येथे संशोधनासाठी कार्यरत आहे, तसेच धनश्री शिंदे ही मुलगी भारत सरकारचे डीआरडीओ या संस्थेमध्ये लॅब असिस्टंट म्हणून नुकतीच रुजू झालेली आहे. अगदी दोन वर्षाचा इतिहास असणारा एमजीएम विद्यापीठाचा रसायनशास्त्र विभाग हा दैदीप्यमान वाटचाल करत आहे.

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम,  कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे संचालिका डॉ.परमिंदर कौर, अधिष्ठाता डॉ.प्राप्ती देशमुख, संचालक डॉ.अण्णासाहेब खेमनार, डॉ.के.एम. जाधव व सर्व संबंधितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

या विद्यार्थ्यांच्या यशामागे विभागप्रमुख डॉ.सूर्यकांत सपकाळ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे विभागाचे प्रतिनिधी डॉ.गणेश पवार विभागातील इतर प्राध्यापक डॉ.जयश्री गवई, डॉ.लक्ष्मीकांत चव्हाण, डॉ.सुरेखा देशमुख, डॉ.सुचिता गादेकर, डॉ.बालाजी मुळीक इत्यादी यांनी विद्यार्थ्यांस मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments