लोकराजा, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीने अभिवादन
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ फतियाबाद ता गंगापूर येथील नामदेव साठे नगर बुद्ध विहार परिसर येथे रिपब्लिकन सेना शाखेच्या वतीने आरक्षणाचे जनक लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.या प्रसंगी रिपब्लिकन सेना जिल्हा महासचिव बबन साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. बाळासाहेब भालेराव व बनसोडे बाबा यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.चैनसिंग ठाकुर यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जिवनाविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी फतियाबाद येथील रिपब्लिकन सेना शाखेचे ,बाळु गायकवाड, विठ्ठल जाधव , कृष्णा भालेराव,बनसोडे बाबा,बाळु भालेराव,आनंद साठे, बंटी जाधव, आदींची उपस्थिती होती.