आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गाजगाव येथे दिनांक २६/०६/ २०२५ रोजी छत्रपती राजश्री श्री. शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गाजगाव शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गुलाब शाह,व जिल्हा कार्याध्यक्ष ग्राम संवाद सरपंच संघटना,
वैजापूर गंगापूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अरुणजी जऱ्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गाजगाव येथे विद्यार्थांना दप्तर, वह्या ,पेन इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या प्रसंगी सरपंच. अंकुश लिंगायत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष कांबळे, उपाध्यक्ष श्रीमती नाजमीन शेख, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य गोरख कांबळे, ज्ञानेश्वर हिवाळे, रामदास कांबळे, रामेश्वर मालकर, रुख्मन शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक.के. एम. बडोगे, शाळेतील शिक्षक भगवान अहिरराव, कल्याण डमाळे, हिराबाई आंधळे, मिनाक्षी काथार, स्मिता पुल्लेवार, सविता थोरात, मनिषा रुपनर, प्रणिता जाधव, इत्यादी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.