वासडी येथील शेत रस्ता मोकळा महसूल विभागाची कारवाई
कन्नड /प्रतिनिधी/ दि २९.कन्नड तालुक्यातील वासडी येथे गेल्या पंधरा वर्षापासून अडवून ठेवलेला शेत रस्ता मोकळा झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निस्वास घेतला आहे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी शेत रस्ते मोकळे करण्याचा धडाका लावला असून अनेक वर्षानुवर्ष शेत रस्त्यां अभावी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी अनेक रस्ते मोकळे करून दिलेले आहेत किंवा नवीन रस्ते करून दिले आहे यापैकी
मौजे वासडी येथे गट क्रमांक ३१५ ते २८६ गोविंद केशव निकम यांच्या शेतातील रस्ता मोकळा करण्यात आला सदर रस्ता हा २०११ पासून प्रलंबित होता.पिशोरचे मंडळ अधिकारी अनिल शिंदे
ग्राम महसूल अधिकारी वासडी एस डी विस्पूते, एस जी मोरे, ग्रामसेवक कंकाळ, महसूल सेवक वाघ, हरून शेख, गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी शेतकरी उपस्थित होते