Tuesday, March 31, 2026
Homeनाशिकअहमदनगरपैठण येथे उत्साही वातावरणात राम नवमी उत्सव साजरी!

पैठण येथे उत्साही वातावरणात राम नवमी उत्सव साजरी!

पैठण येथे उत्साही वातावरणात राम नवमी उत्सव साजरी!

पैठण येथे रामनवमीनिमित्त शहरातील खंडोबा चौकातून पैठण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय  देशमुख, सपोनि सिद्धेश्वर गोरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाले. यावेळी प्रभू श्रीराम भक्त व उत्सव समितीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभाग झाले होते.
पैठण शहरात रामनवमीनिमित्त प्रभू श्रीरामचंद्र यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी रामभक्तसह सार्वजनिक उत्सव समितीचे पदाधिकारी व शहरातील विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.गावातील नाथ मंदिरातील संत एकनाथ महाराजांच्या पूजेतील भगवान प्रभु रामचंद्र,भगवान लक्ष्मण, सीतामाता व विजयी पांडुरंग यांच्या मुर्तीचा महा अभिषेक नाथ वंशस्त रघुनाथ महाराज गोसावी  पालखीवाले यांच्या हस्ते पुरोहित रवींद्र साळजोशी यांच्या मंत्रघोषात पार पडला.यावेळी प्राचीन रामायण ग्रंथ तथा एकनाथ महाराज लिखित भावार्थ रामायण या ग्रंथाची पुजा करण्यात आली.योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांचे यावेळी प्रवचन झाले.याप्रसंगी रावसाहेब महाराज गोसावी,रविंद्र पांडव,अथर्व पांडव,
सचिन पांडव,श्रीकृष्ण कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, दिनेश पारीख, गणेश रोकडे,साहेबराव रोकडे,भालेराव, चौधरी, गणेश पंजावाले, अदि मान्यवर उपस्थित होते.
भगवान प्रभु रामचंद्र त्रेता युगात पैठणला येऊन गेल्याचा इतिहास सांगतो. गोदा काठावरील जुन्या तेलवाडी येथे प्रभू रामचंद्रांनी महादेवाच्या पिडीची स्थापना केली.तेथेही मोठ्या उत्साहात राम नवमी उत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि सिद्धेश्वर गोरे, यांनी मिरवणूक प्रसंगी बंदोबस्त तैनात ठेवून  मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल सर्व रामभक्त व नागरिकाचे पोलीस विभागातर्फे आभार  व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments