प्रदीप आमराव यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या गंगापूर युवा तालुका अध्यक्ष पदी निवड
गंगापूर/प्रतिनिधी/सुभान शहा/ गंगापूर जि छत्रपती संभाजीनगर. सप्रेम जयभीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा जिल्हा अध्यक्ष आयु. राकेश पंडित यांच्या मान्यतेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या गंगापूर युवा तालुका अध्यक्ष पदी प्रदीप आमराव यांची निवड नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली आहे. या नियुक्ती पत्रात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विचार नुसार पुढील काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए च्या माध्यमातून युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या निवडीबद्दल प्रदीप आमराव यांना अभिनंदन व शुभेच्छा चे वर्षाव होत आहे,