अंबड/प्रतिनिधी/ बालपणीच्या शाळकरी मित्रांच्या मैत्रीला तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा उजाळा मिळाला. जुन्या आठवणी, वर्गातील किस्से, हास्य-विनोद, गप्पा आणि मनसोक्त नृत्याने रंगलेला अविस्मरणीय गेट-टुगेदर सोहळा रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी रोहिलागड येथील वर्गमित्र गणेश बरांडे यांच्या शेतात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सुमारे दीड महिन्यापूर्वी ईश्वर तसेवाल यांनी मित्रांना फोन करून शाळेतील जुन्या मित्रांचा गेट-टुगेदर आयोजित करण्याची संकल्पना मांडली. त्यानंतर गावातील मित्रांनी एकत्र येत नियोजन केले आणि अखेर २० वर्षांनंतर बालपणीचे मित्र एकाच ठिकाणी जमले.
या भेटीत प्रत्येकाने शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. वर्गातील मजेशीर प्रसंग, शिक्षकांच्या आठवणी, बालपणीच्या गमती-जमती आणि जुन्या मित्रांच्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. हास्य-विनोद आणि नृत्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले. अनेक वर्षांनंतर एकमेकांना भेटलेल्या मित्रांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि भावनिक क्षण विशेष ठरले. काही काळासाठी सर्वांनी पुन्हा आपले बालपण अनुभवले.
या स्नेहमेळाव्यास ईश्वर तसेवाल, गणेश वायकर, पुनम गोलवाल, सागर नांगलोत, रामदास पाटील, शरद टकले, रमेश गव्हाड, दत्ता टकले, गणेश पाटील, परमेश्वर पाटील, परसराम वैद्य, मुंतजिर तांबोळी, रामेश्वर लालछोटे, रामसिंग काकरवळ, संदीप शहाणे, अशोक गाढे, अमोल जाधव (चांगदेव), प्रवीण मोरे, विक्रम गुसिंगे, अर्जुन दूधाटकर, गणेश थोटे, बळीराम मोरे, हरी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रवींद्र पाटील, गणेश बरांडे, मनोज बमनावत, गोपाल चरावंडे, फिरोज शेख, भारत चंदनशिव, संतोष परकाळे, एकनाथ आवटे, सुभाष मुऱ्हाडे, गब्बर सिंग, आनंद गुसिंगे, रमेश उसारे, विनोद वैद्य, रोहिदास नागलोत, ईश्वर गुसिंगे, चैनसिंग लालछोटे, अनिल गांगे, हनुमान तारडे, भरत टकले, दत्ता पाटील, योगेश पाटील, प्रताप गुसिंगे, राजू खोकड आणि बिबीशन पाटील आदी बालमित्र उपस्थित होते.