सोयगाव तालुक्यातील घाणेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज, नांदागाव येथे क्रांतिसूर्य महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्यांचा अनावरण सोहळा
सावळदबारा/प्रतिनिधी/ सोयगाव तालुक्यातील घाणेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज, नांदागाव येथे क्रांतिसूर्य महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्यांचा अनावरण सोहळा शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी झाले माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील बनकर, भाजपचे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी,जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील मोठे, अशोक गरूड,जे.के.चव्हाण उपस्थित होते.
विविध विकासकामांचेही उद्घाटन करण्यात आले. देव्हारी येथे सिमेंट रस्ता व सामाजिक सभागृह, डाभा येथे सामाजिक सभागृह, नांदातांडा येथे सिमेंट रस्ता, घानेगाव येथे सामाजिक सभागृह तसेच मुर्ती येथे सामाजिक सभागृहाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.कार्यक्रमाला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील बनकर,अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील मोठे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक गरूड,सुनिल मिरकर,जे.के.चव्हाण,माजी सभापती नवलसिंग पाटील,जि.प.सदस्य राधाकृष्ण काकडे,तालुका अध्यक्ष संजय पाटील,प.स. वृषाली मिरकर, सभापती उत्तम चव्हाण,प.स.राहुल राठोड,सुनिल गावंडे, संजिवन सोनवणे, भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते,नितु ठाकुर,गजानन पवार, जयप्रकाश चव्हाण,पंजाबराव कोलते,कैलास शेळके,गणेश लोखंडे, वर्धन चव्हाण, लवकेश जाधव,अनिल राठोड, जीवन कोलते,संभाजी पवार,सुरज कवाल,,योगेश शिंदे ,एकनाथ सपाटे,दिनकर शिपल्कर, संजय चव्हाण,मुकदा गायकवाड, प्रमोद पाटील, लक्ष्मण पवार,सिताराम जाधव,बेल आप्पा पंधाडे,राजु दांडगे,अतुल चव्हाण आदी होते