Homeऔरंगाबादरामदास पाटलांच्या उपस्थितीत देगलूरमध्ये मविआचा जल्लोष

रामदास पाटलांच्या उपस्थितीत देगलूरमध्ये मविआचा जल्लोष

रामदास पाटलांच्या उपस्थितीत देगलूरमध्ये मविआचा जल्लोष

देगलूर/प्रतिनिधी/ महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या विजयाचा आनंद देगलूरमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठाणकर यांच्या उपस्थितीत साजरा केला.
        लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, हलगीचा गजर आणि विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीच्या विचारांना दिलेला कौल हा कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक असल्याची
      भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. काँग्रेससह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी काँग्रेस व महाविकास आघाडीचे आजी -माजी पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments