Thursday, August 6, 2026
Homeऔरंगाबादपैठण एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; अवैध दारू, टवाळखोर आणि सायबर रील प्रकरणांवर...

पैठण एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; अवैध दारू, टवाळखोर आणि सायबर रील प्रकरणांवर एकाच वेळी ७ ठिकाणी छापे

पैठण एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; अवैध दारू, टवाळखोर आणि सायबर रील प्रकरणांवर एकाच वेळी ७ ठिकाणी छापे

पिंपळवाडी/प्रतिनिधि/ पैठण:पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलिसांनी एकाच वेळी सात वेगवेगळ्या प्रकरणांवर मोठी कारवाई केली आहे. या धडक मोहिमेमुळे परिसरातील अवैध धंदेवाईक आणि टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत.पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हद्दीतील अवैध देशी दारू विक्री, संशयास्पद पान टपऱ्या आणि हॉटेल्सची कसून तपासणी केली. या तपासणीदरम्यान अनेक बेकायदेशीर बाबींवर पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारला.शाळा-महाविद्यालय परिसरात टवाळखोरांना चापगेल्या काही दिवसांपासून शाळा आणि महाविद्यालयीन परिसरामध्ये टवाळखोरी करणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढले होते. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी विशेष मोहीम राबवून टवाळखोरांना ताब्यात घेतले आणि त्यांची चांगलीच अद्दल घडवली. तसेच अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही संवेदनशील भागात गस्त वाढवून तपासणी करण्यात आली.परदेशी नागरिक आणि सायबर रील प्रकरणांवर नजरया कारवाईत पोलिसांनी परदेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत असलेल्या ‘सी-फॉर्म’ (C-Form) नियमांची काटेकोर तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. यासोबतच, सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे ‘सायबर रील’ झबनवणाऱ्या प्रकरणांचीही गंभीर दखल घेऊन त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.एकत्रित ७ कारवायांनी
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments