Homeऔरंगाबादडाक सेवांबाबतच्या तक्रारींच्या निवारणासाठी 6 नोव्हेंबर रोजी डाक अदालत

डाक सेवांबाबतच्या तक्रारींच्या निवारणासाठी 6 नोव्हेंबर रोजी डाक अदालत

डाक सेवांबाबतच्या तक्रारींच्या निवारणासाठी 6 नोव्हेंबर रोजी डाक अदालत

छत्रपती संभाजीनगर :- टपाल सेवा, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्रे आदी डाक सेवांबाबतच्या प्रलंबित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या वतीने शुक्रवार, दि. 6 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही डाक अदालत प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात होणार आहे.

        छत्रपती संभाजीनगर डाक विभागांतर्गत येणाऱ्या ज्या नागरिकांच्या डाक सेवेसंदर्भातील तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झालेले नाही किंवा संबंधित कार्यालयाकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची या डाक अदालतीत दखल घेण्यात येणार आहे.

       यामध्ये विशेषतः टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्रे आदी सेवांशी संबंधित तक्रारींचा समावेश असेल. तक्रार अर्जामध्ये तक्रारीचा संपूर्ण तपशील, मूळ तक्रार पाठविल्याची तारीख तसेच ज्या अधिकाऱ्याकडे तक्रार पाठविली होती, त्या अधिकाऱ्याचे नाव व पदनाम नमूद करणे आवश्यक आहे.

         संबंधित नागरिकांनी आपली तक्रार प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर – 431001 यांच्या नावे दोन प्रतींमध्ये तयार करून दि. 3 नोव्हेंबर 2026 पर्यंत किंवा त्यापूर्वी कार्यालयात पोहोचेल अशा पद्धतीने पाठवावी. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments